Pune News : उद्धव ठाकरेंना पुण्यात धक्का! युवासेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; पदांसाठी पैशांची मागणी झाल्याचा आरोप

Pune News :  एकीकडे लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच पुण्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना पत्र लिहित सामूहिक राजीनामे दिले आहेत. ऐन लोकसभेच्या धामधुमीतउद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील अंतर्गत नाराजी समोर समोर आली आहे. पुण्यामधील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेवर नाराजी व्यक्त करत सामुहिक राजीनामे दिले आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि पदासाठी केलेली पैशाची मागणी या गोष्टींना वैतागून अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणाची केली निर्घृण हत्या

संघटना वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले .पण पदाधिकाऱ्यांकडून घाणेरडी वागणूक मिळाल्याचा आरोप या राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच पक्षांतर्गत गटबाजी, शिवसेना पक्ष आणि मतभेद हे कायम पाहायला मिळते. मात्र पदासाठी पैशांची मागणी केली जात आहे, असा गंभीर आरोपही या पत्रामध्ये करण्यात आला आहे. हे सर्व पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटामध्येही अंतर्गत वाद उफाळून आला होता. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांकडून विचारात घेतले जात नसल्याची खंत व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांही राजीनामा अस्त्र उचलले होते. त्यानंतर आता ठाकरे गटालाही मोठा धक्का बसला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply