Pune News : मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर पुण्यात झळकले, निकालापूर्वीच सेलिब्रेशन सुरु

Pune News : निवडणुकीचा प्रचार सुरु असताना विजयाचा दावा सर्वच उमेदवार करत असतात. पण मतदान संपल्यावर हे उमेदवार काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असतं. पुण्यातील कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेगकर यांनी आपण पन्नास हजारांच्या आसपासच्या मताधिक्यानी निवडून येईन असा दावा केला आहे. त्याचबरोबर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरुडमधून आपल्याला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा दावा केलाय. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहळ यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील मुरलीधर मोहळांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फ्लेक्स लावण्यात आलेत. 

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी मतदान पार पडलं असून 4 जून रोजी त्याचा निकाल लागेल. पण त्या आधीच काँग्रेस आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जात आहे. आता या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी त्या पुढेही जात थेट आपल्या नेत्यांचे भावी खासदार असं होर्डिंग लावल्याचं दिसतंय. 

Saamana Editorial : १० वर्षांत ५६ इंच जमिनही भारतात आणू शकले नाही; 'पाकव्याप्त काश्मीर'वरून ठाकरे गटाचा भाजपवर हल्लाबोल

भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाचे भावी खासदार या आशयाचे बॅनर्स पुण्यात झळकताना दिसत आहेत. त्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच सेलिब्रेशन सुरू केल्याचं दिसतंय. 

पुणे लोकसभेसाठी यंदा तिरंगी लढत असून वसंत मोरे हे वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पण मुख्य लढत ही काँग्रेसचे रविंद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्येच असल्याचं सांगितलं जातंय. 

दरम्यान, पुण्यामध्ये भाजपकडून मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप करत रवींद्र धंगेकरांनी रविवारी पोलीस ठाण्यातच आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी करत त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याचं दिसून आलं. तर धंगेकरांच्या आंदोलनाला भाजपच्या कार्यकर्त्यांनीही ठिय्या आंदोलन करत उत्तर दिलं. पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत. 

 

 
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply