Pune News : पिंपरी चिंचवड : मतदान केंद्रावर गाेंधळ, उध्दव ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाला अटक

Pune News : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिंपरी चिंचवडचे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस ठाण्यात हा गुन्हा नाेंदविण्यात आला असून भाेसले यास अटक केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सचिन सुरेश भोसले हे नागु बारणे प्रशालेचा मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी आले असता बाहेरून त्यांनी मोबाईल मागवून घेऊन मतदानाचे मशीन उलट्या क्रमाने लावलेले आहे याबाबतचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले

तसेच त्यांनी मतदान प्रक्रिया राबविणारे अधिकाऱ्यांशी उद्धट वर्तन करून त्यांना शासकीय कर्तव्य निभावण्यामध्ये अडथळा आणला. या प्रकरणी सचिन भोसले यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले.

दरम्यान माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा सचिन भोसले यांनी केला आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply