Pune : फुरसुंगी उरुळी कचरा डेपोला १८ देशाच्या प्रतिनिधींची भेट

पुणे : आफ्रिका आणि आशिया खंडातील १८ देशांच्या प्रतिनिधींनी आज पुणे महापालिकेच्या फुरसुंगी आणि देवाची उरुळी येथील कचरा डेपोवरील कचरा व्यवस्थापनाची पद्धती, प्रक्रिया प्रकल्प, कॅपींगच्या कामाची पाहणी करत या कामाचे कौतुक केले.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशामध्ये कचरा व्यवस्थापनाचे प्रयोग सुरू आहेत. त्याअंतर्गत १८ देशाचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यापैकी १४ प्रतिनिधी हे आफ्रिका खंडातील तर उर्वरित चार हे बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, आणि भूतान हे आशिया खंडातील होते. या परदेशी पाहुण्यांना पुणे महापालिकेचा फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथील प्रकल्प दाखविण्याचे नियोजन करण्यात आले होते.

देवाची उरुळी आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमधील बायोमायनिंग, कचरा प्रक्रिया प्रकल्प, कचरा कॅपिंग आणि वृक्षारोपण करण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती या प्रतिनिधींनी घेतली. तेथे सुरू असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि बायोमायनिंगच्या माध्यमातून खतनिर्मिती प्रकल्पाचे या प्रतिनिधींनी कौतुक केले.

दोन दिवसांच्या पुणे भेटीवर आलेल्या या प्रतिनिधींनी बुधवारी काही घरांमध्ये जाऊन ओला व सुका कचरा गोळा करणे, त्याची प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वाहतूक, तसेच प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प आणि जुन्या साठलेल्या कचऱ्यावरील बायोमायनिंग प्रक्रिया, या प्रकल्पांमधून होणारी सेंद्रिय खत निर्मितीची माहिती घेतली. कचरा गोळा करण्यापासून त्यावरील प्रक्रियेसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे या प्रतिनिधींनी कौतुक केले, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply