Pune News : रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Pune News : गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. अशातच रणरणत्या उन्हात दुचाकीवरून निघालेल्या एका कामगाराला अचानक चक्कर आली. शुद्ध हरपल्याने तो रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाखाली जाऊन झोपला.

त्याला मदत करण्याऐवजी अज्ञाताने दुचाकीला अडकवलेली २३ लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढला. ही धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज घाटातील एका वळणावर शुक्रवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास घडली.

Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार मुलींची सुटका

याप्रकरणी उद्योजकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. सध्या पोलीस कात्रट घाट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा महामार्गावर वेळू गावात एक खासगी कंपनी आहे. कंपनीतील कामासाठी २३ लाख ५० हजारांची रोकड घेऊन कामगार कात्रज घाटातून निघाला होता. घाटातील एका हॉटेलजवळील वळणावर कामगाराला चक्कर आली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply