Pune News : मुळशी तालुक्यात मोठी पाणी समस्या, अजित पवारांनी घेतली तातडीची बैठक

Pune News : कोळवण परिसरातील मुगावडे ते चिखलगाव व चिखलगाव ते काशिग येथील शेती साठीच्या पाण्याची व पिण्या साठीच्या पाण्याची मोठी भीषण समस्या आहे.शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या कशी सोडवायची याबाबत योग्य उपाय योजना करून कायमचा सुटावा म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट कोळवण मधील राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली.

या भेटीत अजित पवार यांनी पाण्याच्या प्रश्नावर संबंधित विभागातील पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.हाडशातील दोन व काशिग मधील एक अशा तीन लघूपाटबंधार्यांच्या सद्यस्थितीची माहिती घेतली.

Pune News : हडपसर वैदुवाडी परिसरात झोपड्यांना आग

या परिसरातील पावसाचा कॅचमेंट एरिया नदीची खोली व पाणी धारण क्षमता याबाबत शास्त्रोक्त अभ्यास करुन येत्या महिनाभरात अहवाल सादर करावा असे निर्देश पवार यांनी जलसंधारण विभागास दिले आहेत.

याबाबत संत तुकाराम सह.साखर कारखाना संचालक महादेव दूडे यांनी सांगीतले की,"कोळवण खोऱ्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठीची समस्या मोठी आहे,फेब्रुवारीपर्यंत पाणी असते त्यानंतर पाणी टंचाई निर्माण होत असते.बागायती पिके घेता येत नाहीत या मुळे पाण्याची समस्या

जर सुटली तर येथील बळीराजा सुखी होईल व गावातील शहरांकडे होणारे रोजगारांसाठीचे स्थलांतर थांबून गावे ओस पडणार नाहीत, म्हणून आज आम्ही दादांची भेट घेतली."

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply