Pune News : पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत आयटी इंजिनीअरची फसवणूक, १९ लाखांचा गंडा

 

Pune News : पुण्यामध्ये एका आयटी इंजिनीअरची  १९ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परदेशामध्ये पाठवण्यात आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळून आल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी या इंजिनीअर महिलेला लाखोंचा गंडा घातला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पाषाण येथे आपल्या पतीसोबत राहणाऱ्या महिला इंजिनीअरची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिला अज्ञात नंबरवरून फोन आला होता. समोरील व्यक्तीने तो मुंबईतील फेडेक्स कुरिअरमधून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाने एक पार्सल मुंबई ते इराण या ठिकाणी जाणार होते. त्या पार्सलमध्ये पासपोर्ट, दोन क्रेडिट कार्ड, लॅपटॉप आणि ७५० ग्रॅम ड्रग्ज आढळल्याचे त्याने सांगितले.

Shahada News : पाच लाख ५९ हजारांची दारू वाहनासह जप्त; म्हसावद पोलिसांची कारवाई

समोरील व्यक्तीने या महिलेला पुढे सांगितले की, याबाबत फेडेक्सने नार्कोटिक्स विभागाला तक्रार दिली आहे. त्यानंतर या व्यक्तीने महिलेला कारवाईची भीती दाखली. आरोपींनी या महिलेची नोकरी आणि बँक स्टेटमेंटबाबत माहिती घेतली. त्यानंतर आरोपीने महिलेला स्काईपवर स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. या महिलेच्या बँक खात्याच्या मोबाईल ॲपद्वारे लिंकवर क्लिक करण्यास तिला भाग पाडले.

तसंच, समोरच्या व्यक्तीने या महिलेला कारवाई टाळण्यासाठी बँक खात्यात १९ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार आपल्यावर कारवाई होईल या भीतीने महिला घाबरली होती. त्यामुळे भीतीपोटी या महिलेने आरोपींच्या बँक खात्यात ही रक्कम आरटीजीएसद्वारे हस्तांतरित केली. त्यानंतर या महिलेने तिच्यासोबत घडलेला हा प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर महिलेने पतीसोबत चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply