Pune News : जलतरण तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

Pune News : मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका १३ वर्षीय मुलाचा खाजगी जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे शहरातील खराडी परिसरात मंगळवारी (ता. १६) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. अतिक नदीम तांबोळी (वय १७ रा. गणेश नगर, वडगाव शेरी) असे मृत मुलाचे नाव आहे. जलतरण तलावाच्या संचालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. 

त्यामुळे अतिकचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही अतिक पाण्याबाहेर न आल्याने त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी या घटनेची माहिती जिमच्या संचालकांना दिली. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिथे कोणीही जीवरक्षक उपस्थित नव्हते. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद होते.

Raj Thackeray : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, उष्णतेची लाट लक्षात घेता राज ठाकरेंचे सरकारला पत्र

दरम्यान, जिमच्या व्यवस्थापकांनी तातडीने पुलाच्या दिशेने धाव घेत अतिकला पाण्याबाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.परंतु उपचारापूर्वीच त्याचा बुडुन मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply