Pune News : ससूनमध्ये केवळ चौकशीचा ‘खेळ’! केवळ समित्या नेमून अहवाल सादर करण्याची घाई

Pune News : बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयात वारंवार गैरप्रकार घडत आहेत. मात्र, केवळ समित्या नेमण्याचा सोपस्कार केला जात आहे. या समित्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे अहवाल सादर करून अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही त्यावर कारवाई झालेली नाही. त्यामुळे केवळ चौकशीचा खेळ सुरू असल्याचे चित्र आहे.

ससून रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी ३१ डिसेंबरला मद्य पार्टी केली होती. त्यावेळी काही मद्यधुंद डॉक्टरांनी निवासी महिला डॉक्टरांच्या खोलीच्या दरवाजाची काच फोडली होती. या प्रकरणी एका महिला डॉक्टरने तक्रार केली होती. या प्रकरणाची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्यांनी ससूनमध्ये आयोजित कार्यक्रमात या पार्टीची छायाचित्रे दाखविली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून जानेवारीअखेरीस अहवाल सादर केला. हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठवूनही अद्याप कारवाई झालेली नाही.

Sanjay Mandlik : खासदार संजय मंडलिकांच्या संपत्तीत काेट्यावधींची वाढ, प्रतिज्ञापत्रात कर्जाचाही उल्लेख



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *