पुणे : किशोर आवरेंच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक; आरोपींना करणार न्यायालयात हजर

पुणे: जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी चार मुख्य आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना आज वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शुक्रवारी तळेगाव नगर परिषदेच्या परिसरात किशोर आवारे यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर पुणे जिल्ह्यासह मावळमध्ये एकच खळबळ उडाली. अवघ्या काही तासातच पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुख्य चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी तिघांना खंडणी विरोधी पथकाने तिघांना पकडले आहे.

शुक्रवारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची नगर परिषदेच्या समोर गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे अवघ्या मावळ परिसरासह पुणे जिल्ह्यात खळबळ माजली. दरम्यान, किशोर आवारे यांच्या वरती वार करणाऱ्या आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. परंतु, अवघ्या काही तासातच याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी दिली आहे. पोलिस उपायुक्त काकासाहेब डोळे म्हणाले, चार आरोपींना आम्ही अटक केली आहे. आज दुपारी वडगाव मावळ कोर्टामध्ये सादर करणार आहोत. हे चारही मुख्य आरोपी आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply