Pune News : पुण्यातील तरुण अमेरिकेत जहाजावरून बेपत्ता; 3 दिवसांपासून शोध मोहीम सुरू

Pune News : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय फार चितेत आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा. गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केलाय.

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त २८५ कर्मचाऱ्यांची ट्रेनिंगला दांडी; गैरहजर कर्मचाऱ्यांना बजावणार नोटिस

प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असंही त्याच्या वडीलांनी सांगितलं आहे. गोपाळ कराड असं बेपत्ता तरुणाच्या वडिलांचं नाव आहे.

प्रणवच्या वडिलांची प्रतिक्रिया

माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाहीये. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमची शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, असंही प्रणवचे वडील म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना ते भावूक देखील झाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply