Pune News : प्रवाशांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ८० ज्यादा बसेस धावणार

Pune News : दिवाळीनिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. त्यानुसार लवकरच विभागातील डेपोंमधून ८० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. 

पुणे विभागाने उन्हाळी सुट्टीसाठी एसटी गाड्यांची संख्या वाढवली आहे. दहावी आणि बारावीची पेपर झाल्यामुळे गावी जाणाऱ्या विद्यार्थी आणि प्रवाशांची संख्या अधिक आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुणे विभागातून सातारा, नाशिक , मुंबई , संभाजीनगर या मार्गावर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Pune Crime News : धक्कादायक! मतिमंद मुलीवर अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा

८० ज्यादा बसेस या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. पुणे विभागात बसची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाला नियोजन करणं अवघड जात आहे. त्यामुळे सध्या फक्त ८० ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला  आहे. सु्ट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन गाड्यांव्यतिरिक्त सुट्ट्यांच्या जादा गाड्या सोडण्याचं नियोजन केलं  आहे.

एप्रिल महिन्यात बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुट्या लागतात. त्यामुळे पुणे शहरातून मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा बसचं नियोजन करते. यावर्षीही पुणे विभागाकडून दैनंदिन गाड्यांशिवाय ८० जादा बसेस सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, असं एसटी प्रशासनानं सागितलं आहे.

पुणे विभागातून सातारा, नाशिक , मुंबई , संभाजीनगर या मार्गावर ज्यादा बस सोडण्यात येत आहे. उन्हाळ्यात राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या गाड्यांना गर्दी असते. प्रवासी संख्येचं योग्य नियोजन करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. लवकरच या बस सुरू होणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply