Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; केमिकल ताडी तयार करणारा कारखाना केला उद्ध्वस्त

Pune News : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल क्लोरल हायड्रेटचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने संगमनेरमध्ये जाऊन कारवाई केली आहे.

पुण्यात केमिकल ताडी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मेफेड्रोन ड्रग्स तस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई केली आहे.

Arvind Kejriwal: केजरीवालांना जामीन मिळणार? ईडीच्या अटकेविरोधात आज दिल्ली हायकोर्टात सुनावणी

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्ध्वस्त केला. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 2300 किलो क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल ) जप्त केली आहे. बाजारात या केमिकलची किंमत 60 लाख रुपयांपर्यंत आहे. तसेच या कारखान्यातून तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

या कारखान्यात क्लोरल हायड्रेट केमिकलपासून तयार केलेली ताडी प्यायल्याने आरोग्याच्या अती- गंभीर समस्या निर्माण होतात. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होवू शकतो. यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईचं कौतुक होत आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी ड्रग्स तस्करी प्रकरणात पुणे आणि दिल्लीतील गोदामात छापे टाकले होते. या कारवाईत पोलिसांनी १६ लाख रुपयांचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त केलं. मेफेड्रोन ड्रग्स तयार करण्यासाठी कच्चा माल पुरविणारा आरोपी पप्पू कुरेशी याने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामावर ही कारवाई करण्यात आली.

कुरेशीने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि दिल्लीतील गोदामात मेफेड्रोन ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply