Pune News : तळेगाव दाभाडे पालिकेचा कर वसुलीसाठी नवा फंडा, ढाेल वादनानंतर आता थकबाकीदारांच्या नावाचे फलक लावणार चौका चौकात

Pune News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी  थकबाकीदारांच्या घरा समोर ढोल वाजवायला सुरुवात केली आहे. वसूलीसाठीच्या या अनाेख्या पद्धतीमुळे थकबाकीदारांकडून आत्तापर्यंत लाखाे रुपयांचा थकीत कर जमा झाल्याची माहिती वसूली पथकाकडून मिळाली. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा नागरिकांनी माेठ्या प्रमाणात कर थकविला आहे. यामुळे तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांनी मिळकतधारकांना नोटीसा दिल्या. त्यानंतरही नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. अखेर पालिकेने थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल वाजवायला सुरुवात केली.

Pune News : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा

यामुळे नागरिकांनी थकीत कर भरण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या महिन्यात शंभर टक्के कर वसुल करून वीस कोटी रुपये नगरपरिषदेच्या कोषागारात जमा करण्याचा निश्चय मुख्याधिकारी यांनी केला आहे.

यासाठी थकबाकीदारांचे नावाचे फलकही चौका चौकात लावण्याचा विचार पालिका करीत असल्याची माहिती तळेगाव नगरपरिषदचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी दिली.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply