Pune : मोठी बातमी! पुण्यात अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे

Pune : पुण्यातून मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यात मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील जुन्नर येथील आळेफाट्यात मराठा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ताफ्यासमोर 'एक मराठा लाख मराठा' अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील आज जुन्नर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, अजित पवारांच्या वाहनाचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांच्या ताफ्याला जुन्नरमधील आळेफाटा चौकात काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.

Gallantry Award 2024 : महाराष्ट्रातील 18 जवानांसह 277 जणांना शौर्य पुरस्कार जाहीर

'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणाबाजी करत अजित पवारांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे. अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या वाहनाला मराठा आंदोलकांनी रोखण्याचा केला प्रयत्न केला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ही जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी आळेफाटा येथे भरचौकात 'एक मराठा लाख मराठा' म्हणत अजित पवारांच्या ताफ्याला अडवून काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी काळे झेंडे दाखवणारे ठाकरे गटाचे जुन्नर तालुकाध्यक्ष माऊली खंडागळे आणि शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुरज वाजगे यांच्यासह सात जणांना आळेफाटा पोलीसांनी ताब्यात घेतले

शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंना पडणार म्हणजे पाडणार असं आवाहन केल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी महायुतीकडून अद्याप उमेदवार कोण अशी चर्चा रंगली आहे.

त्यातच अमोल कोल्हेंना आव्हान देण्यासाठी तरुण चेहरा मैदानात उतरणार आहे, यासाठी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार शिरुर लोकसभा मतदार संघातून लढणार अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply