Pune News : साखर संघ आणि ऊस तोडणी कामगारांची बैठक विस्कटली; शरद पवार काय देणार निर्णय?

Pune News : साखर संघ आणि ऊस तोडणी कामगारांच्या संघटनामध्ये ऊस तोडणीच्या मजुरीवर आणि मोबदल्यावर झालेली बैठक विस्कटली. या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही. दरम्यान ऊस तोड कामगार संघटनेच्या मागणीवर निर्णय देणं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हातात असणार आहे, शरद पवार यावर कोणता निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ही बैठक ५ जानेवारीला शरद पवार यांच्या उपस्थितीत मांजीर येथील वसंत दादा इन्स्टीट्युटमध्ये होणार आहे. 

आज ऊस तोडणी कामगार  आणि साखर संघाचे प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. परंतु या बैठकीत साखर संघ प्रतिनिधींमध्ये एकमत होऊ न शकल्यानं ही बैठक विस्कटली. येणाऱ्या ८ दिवसांत योग्य मार्ग निघला नाही तर राज्यातले सर्व साखर कारखाने उसाच्या अभावी बंद पडतील. संघटनाच्या भूमिकेमुळे ऊस तोडणी कामगारसुद्धा बेमुदत कोयता बंद करण्याची भूमिका घेतलीय.

Kolhapur News : अनधिकृत मदरसे आणि प्रार्थना स्थळांवर कायदेशीर कारवाई करा; हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

महाराष्ट्राच्या साखर कारखान्यावर काम करणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या संघटनांनी घेतलेली भूमिका साखर संघाच्या प्रतिनिधींनी अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. संघटनाच्या भूमिकेमुळे ऊस तोडणी कामगारसुद्धा बेमुदत कोयता बंद करण्याचे भूमिकेत आहेत. या गोष्टीची दखल साखर संघाने घेतली आहे. त्यामुळे संघटनांनी बंदची हक्क दिल्यानंतर आज तातडीची बैठक घेण्यात आली. पुणे येथे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस तोडणी कामगारांच्या एकूण ८ संघटना आणि साखर संघाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठक झाली.

ऊस तोडणी कामगाराच्या मागणीबाबत योग्य तोडगा काढावा, अशी विनंती संघटनेला केली होती. परंतु बैठकीत कोणताच मार्ग न निघाल्याने याबाबतचा निर्णय आताशरद पवार यांच्याकडे सोपण्यात आलाय. मांजरी येथील वसंत दादा इन्स्टीट्युटमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. ५ जानेवारीला होणाऱ्या बैठकीला पंकजा मुंडे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान ऊस तोड कामगारांनी तोडणीचा दर वाढवावा, अशी मागणी केलीय. ऊस तोडणी मजुरांनी ४० टक्के दरवाढ देण्याची मागणी साखर कारखान्यांकडे केलीय. तर साखर संघ २९ टक्के दरवाढ द्यायला तयार आहे. परंतु त्यावर सहमती न झाल्याने आज झालेली बैठक विस्कटली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply