Pune News : पुण्यात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक! JM रोडवर दुकानांचे बोर्ड फोडले

Pune News : राज्यातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. त्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दरम्यान मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर पुण्यात मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

पुण्यातील जंगली महाराज रोडवर मनसेच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी इंग्रजी भाषेत असलेल्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड देखील करण्यात आली. यावेळी चार-पाच दुकानांवर लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्या मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या. दरम्यान घटनास्थळी पोहचलेले पोलिस आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यानंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं आहे.

Pune : ‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनात नवा इतिहास; प्रथमच मुलींच्या बटालियनने दिली मानवंदना

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पुणे महापालिका हद्दीतील सर्व दुकाने व आस्थापनेवरील पाट्या मराठीत न केलेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी याबाबत महानगरपालिकेला मनसेकडून पत्रही देण्यात आले होते. तसेच महापालिकेने मराठी पाट्यांबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आज मनसे कार्यकर्त्ये रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply