Pune News : दगडखाण कामगारांचा लेकराबाळांसह पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च

Pune News : वाघोली येथील गायरान जमिनीवर पिढ्यान- पिढ्या राहत असल्याने या जमिनीचा सातबारा स्वतःच्या नावावर व्हावा या प्रमुख मागणीसाठी सुमारे एक हजार दगडखाण कामगारांनी आज (बुधवार) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर लाॅंग मार्च काढला आहे. या मार्चमध्ये महिला व पुरुष दगडखाण कामगार आपल्या लहान मुलाबाळांसह सहभागी झाले हाेते. 

वाघोलीतील गायरान जमिनीवर मागील कित्येक वर्षांपासून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय दगडखाण कामगार राहत आहेत. गायरान जमिनीवर राहणाऱ्या दगडखाण कामगारांना त्यांची हक्काची जमीन मिळावी यासाठी दगड खान असंघटित कामगार विकास परिषद सन 2000 पासून शासन दरबारी मागणी करत आहे.

17 एप्रिल 2015 ला पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वाघोली येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याबाबत आदेश दिले होते. मात्र अजूनही गायरान जमिनीवरील अतिक्रमण हे नियमित झाले नसल्याने आज हा लॉन्ग मार्च काढला आहे अशी माहिती वकील बी.एस.रेगे (अध्यक्ष, दगडखाण असंघटित कामगार विकास परिषद) 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply