Pune : चाकण ते चिंबळी फाटा वाहनांची सहा किलोमीटर रांग, वाहतुक काेंडीने प्रवाशांसह कामगार ,विद्यार्थी त्रस्त; पाेलिसांची दमछाक

Pune Nashik Highway Traffic : पुणे नाशिक महामार्गावर चाकण औद्योगिक क्षेत्रात आज (शनिवार) सकाळपासून वाहनधारकांना वाहतूक कोंडीने बेजार केले आहे. या महामार्गावर तब्बल पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणा-या वाहनांची तब्बल पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांग लागली. त्यामुळे एकाच जागी वाहन चालकांना वीस मिनीट थांबावे लागत असल्याचे चित्र हाेते.

मागच्या अनेक दिवसांपासून चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक कोंडी प्रवाशांसह स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना यामध्ये विकेंडच्या सुट्टीच्या गर्दीची भर पडू लागली आहे. आज सकाळपासुन पुणे नाशिक महामार्गावर चाकण ते चिंबळी फाटा पर्यत माेठी वाहतुक कोंडी झाली आहे. या वाहतुक कोंडीत प्रवाशांसह कामगार ,विद्यार्थी अडकले असुन वाहतुक कोंडी साेडविण्यासाठी पोलीसांची चांगलीच दमछाक होत आहे.

चाकण एमआयडीसी क्षेत्रात होणार वाहतुक कोंडी काढण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये मात्र कायमच उदासिनता दिसुन येत आहे. त्यामुळे वाहतुक समस्या नित्याचीच झाली आहे असे काही ग्रामस्थांचे तसेच वाहनधारकांचे म्हणणे आहे.

काही वाहनधारकांनी शनिवार , रविवार सुट्ट्या आल्याने अचानक रस्त्यावर माेठ्या प्रमाणात वाहन आली. त्यामुळे वाहतूक कोंडी माेठ्या प्रमाणात झाल्याचे सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply