
Pune : पुणे-मुंबई महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या ‘मिसिंग लिंक’वर पहिल्या टप्प्यात हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या कोंडीसारखा प्रकार तिथे होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीला सध्या तरी परवानगी न देण्याच्या प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळांच्या (एमएसआरडीसी) विचाराधीन आहे.
महामंडळाच्या उपाययोजना निश्चित
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच डोकेदुखी झाली आहे. त्यात या महामार्गावर ज्वलनशील पदार्थ किंवा कोणत्या पदार्थांचे टँकर बंद पडले अथवा धडक झाल्यास त्यामुळे कित्येक तास वाहतूक कोंडी होते. काही आठवड्यांपूर्वीच या महामार्गावर प्रोपिलीनचा टँकर उलटला. त्याला हटविण्यास ३० ते ३२ तास लागले. या काळात महामार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल झाले होते. कोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे महामंडळाच्या नियोजनाकडे प्रवाशांनी बोट दाखवून संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने काही उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे.
केवळ हलकी वाहने
येत्या एक मेपासून मिसिंग लिंक प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन रस्ते विकास महामंडळाने केले आहे. मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ज्वलनशील पदार्थांच्या वाहनांच्या अडथळ्याची घटना ताजीच आहे. त्या पार्श्वभूमीवर काही मान्यवर आणि संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून ‘मिसिंग लिंक’वर हलक्या वाहनांना प्रवास करण्याचा आनंद घेऊ द्या, अशा शब्दांत विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या विनंतीमुळे त्याबाबतची सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सहा महिन्यांनी पुनर्विचार
या पार्श्वभूमीवर हा रस्ता मे महिन्यात सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात सहा महिने प्राधान्याने हलक्या वाहनांना प्रवासाला मुभा दिली जाणार आहे. त्या वेळी ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना मात्र परवानगी देण्यात येणार नाही. सहा महिन्यानंतर मिसिंग लिंकवरील प्रवासी वाहनांची संख्या, त्यातील चांगले-वाईट अनुभव आणि अडथळे यांचा अभ्यास केला जाईल, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
एप्रिल महिन्यात या मार्गावर वाहनांच्या चाचण्या घेण्यात येण्याचे संकेत ‘एमएसआरडीसी’कडून देण्यात आले आहेत. त्यानंतर मे महिन्यात हा नवा पर्यायी मार्ग खुला करण्याचे नियोजन आहे. एक मेचा हा मुहूर्तही कदाचित तांत्रिक कामांमुळे हुकण्याची शक्यताही महामंडळातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

