Pune-Mumbai Expressway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक

Pune-Mumbai Expressway : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.  दुपारी 12 ते 2 या वेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.  गॅन्ट्री बसवण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत देण्यात आला आहे. 

Ashok Chavan Resign : मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाणार?

वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवरृ वळवुन मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग या जुन्या पुणे-मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील. द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिटजवळून वळवून राष्ट्रीय महामार्ग जुना पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply