Pune Metro News : पुणेकरांसाठी रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो प्रवास आजपासून सुरू; PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

Pune Metro News : पुणे मेट्रोच्या रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. अशात आज या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होत आहे. २ वर्षांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होत. यावेळी ते स्वत: पु्ण्यात उपस्थीत राहिले होते. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदी उद्घाटन करणार आहेत.

पहिल्या टप्प्यात वनाझ ते रुबी हॉल असा 9.7 किमीचा मार्ग सुरु करण्यात आला होता. आज याच मार्गाचा पुढील टप्पा म्हणजे रुबी हॉल ते रामवाडी या 5.5 किमीच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होत आहे. या सेहळ्यासाठी रुबी हॉल मेट्रो स्थानक फुलांनी सजवण्यात आलं आहे. भव्य सजावट केल्याने रुबी हॉल  मेट्रो स्थानकाची शोभा आणखी वाढलीये. रुबी हॉल ते रामवाडी हा मार्ग आज दुपारी १२ नंतर पुणेकरांसाठी खुला करण्यात येणार आहे.

Amit Shah : महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर.. जळगावच्या सभेत अमित शहा कडाडले

गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकर या मार्गाचे आतुरतेने वाट पाहत होते. प्रवासासाठी ट्रेनची सुविधा नसल्याने नागरिकांना बायरोड प्रवास करावा लागत होता. यामुळे मार्गवाढवूनही वाहतूक कोंडी सुटता सुटत नव्हती. रोजच्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांना वाट काढत कामावर जावे लागत होते.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणही मोठ्याप्रमाणावर वाढले होते. मात्र आता रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो सुरू झाल्याने नागरिकांची या सर्व त्रासातून सुटका होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply