Pune Metro Escalator Accident : धक्कादायक! मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून पडून प्रवाशाचा मृत्यू

Pune : पुण्यातील मेट्रो स्थानकातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मेट्रो स्थानकात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर ही घटना घटना घडली आहे. मेट्रो स्थानकात ४० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज कुमार असे प्रवाशाचे नाव आहे. मेट्रो स्थानकात मनोज कुमार या नावाचा प्रवासी सरकत्या जिन्यावरून अचानक पडला. या दुर्घटनेत या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. प्रवाशाच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. मेट्रो स्थानकात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या मृत्यूचे नेमके कारण पोलीस तपासत आहेत. पुणे पोलिसांकडून मेट्रो स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे.

Bhushi Dam : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, अनधिकृत टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

पुण्यातील जिल्हा न्यायालयात मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता सरकत्या जिन्यावरून जाताना मृत्यू झाला. स्थानकातील मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावर जाताना अचानक प्रवासी मनोज कुमार पडले. मनोज कुमार यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या शवनिच्छेदनातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. मात्र, त्यांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मनोज कुमार यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर मनोज कुमार राहत असलेल्या परिसरातही शोककळा पसरली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सरकत्या जिन्यावरून उतरणाऱ्या मुलीचा व्हायरल झाला होता. या मुलीचा सरकत्या जिन्यावरून उतरताना अपघात झाला होता. या सरकत्या जिन्यात या मुलीचा पाय अडकला होता. त्यानंतर मॉलमधील कर्मचाऱ्यांनी या सरकते जिने तातडीने थांबवले होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply