Pune Metro : चोरट्यांचा प्रताप, चक्क पुणे मेट्रोच्या खांबांची चोरी, ६ जणांना ठोकल्या बेड्या

Pune Metro News in Marathi : पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या आणि हत्येच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. चोरीच्या वेगवेगळ्या घटना दररोज समोर येतात, आता त्यामध्ये मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी दोन लाख रूपयांच्या मेट्रोचे खांब चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांकडून याचा शोध घेतला जातोय.

पुण्यातील चोरट्यांच्या निशाण्यावर आता पुणे मेट्रोच्या खांब आल्याचे निदर्शनास आलेय.पुण्यातील शिवाजीनगर भागातील कामगार पुतळा परिसरातून मेट्रोचे दोन लाख रुपयांचे लोखंडी खांब चोरल्याचा प्रकार उघड झालाय. मेट्रो रेल्वेचे खांब चोरणाऱ्या सहा चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश मच्छिंद्र कांबळे, अनिकेत महेंद्र कांबळे, तौसिफराज फैजअहमद शेख, शमशुद्दीन युसुफअली शेख मन्सुरी, वसीम अयुब पठाण आणि मुस्तफा मुस्तकीम शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Bhiwandi Manja Accident : पंतगीच्या मांजाने घात केला; तरुणाचा गळा चिरला, प्रकृती गंभीर

शिवाजीनगरमध्ये चोरट्यांनी दोन लाख रूपयांच्या मेट्रोचे खांब चोरल्याची फिर्याद मेट्रोचे सुरक्षारक्षक चंद्रकांत शेलार यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारावर पोलिसांनी वरील सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. ते आणखी कोणत्या गुन्ह्यात सामील आहेत का? त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सध्या सुरू आहे. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील कामगार पुतळा परिसरात मेट्रोचे साहित्य ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी कांबळे, शेख, मन्सुरी, पठाण यांनी कामगार पुतळा परिसरात लोखंडी खांब चोरून नेले होते. लोखंडी खांब विकून त्यातून पैसे कमावण्याचा हेतू असल्यानं त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्या असून तपास सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply