पुणे : बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्यांवर कारवाईच्या मागणीसाठी पुण्यात पतित पावन संघटनेचे आंदोलन

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडसह विविध ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर लावण्याऱ्या परप्रांतीय, बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी पुण्यात पतित पावन संघटनेच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज ते गुडलक चौकापर्यंत आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी घुसखोर व्यावसायिक आणि रोहिंग्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पतित पावन संघटनेचे प्रांताध्यक्ष सोपानराव देशमुख, प्रांत चिटणीस नितीन सोनटक्के, शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते अली दारुवाला यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

सोपानराव देशमुख म्हणाले की, पुण्यात फर्ग्युसन रोड, तुळशीबाग, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता अशा विविध वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत स्टॉल पदपथावर परप्रांतीय बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनी स्थानिक पुढारी, प्रशासनातील लोकांना हाताशी धरून चालविले जातात.यामुळे नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकाना होत आहे.याबाबत दोन दिवसापूर्वी पुणे पालिका आयुक्त विक्रमकुमार यांना संघटनेचे शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले होते. त्यावर प्रशासनमार्फत तात्पुरती कारवाई करण्यात आली. पण पुन्हा स्टॉल दिसू लागले. त्यावर आज आम्ही आंदोलन केले असून येत्या आठ दिवसात बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्यांवर कारवाई न झाल्यास राज्यभरात आंदोलनांचे पडसाद उमटतील असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply