पुणे ठरले ‘प्लॅटिनम’ नामांकन मिळवणारे देशातील दुसरे शहर

पुणे : पर्यावरणपूरक धोरणांची अंमलबजावणी करून हरित पायाभूत सुविधांना प्राधान्य देणाऱ्या पुणे महापालिकेला ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल’ने (आयजीबीसी) प्लॅटिनम नामांकन प्रदान केले आहे. हा बहुमान मिळवणारे पुणे हे देशातील दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले शहर ठरले आहे. याआधी राजस्थानमधील राजकोटला हे प्रमाणपत्र मिळाले होते. 

शाश्वत विकासासाठी योगदान देणाऱ्या सरकारी यंत्रणा, विकसक, वास्तूविशारद आणि सल्लागारांचा सन्मान आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याला मिळालेले प्लॅटिनम नामांकनाचे प्रमाणपत्र महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वीकारले. या वेळी खासदार वंदना चव्हाण, ‘यशदा’चे महासंचालक एस.चोक्कलिंगम, आयजीबीसी पुणे चॅप्टरचे अध्यक्ष जे.पी.श्रॉफ, सीआयआय ग्रीनकोचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, आयजीबीसी पुणे चॅप्टरच्या सहअध्यक्षा डॉ.पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.

पुणे महापालिकेने हरित धोरण आखणी, हरित पायाभूत सुविधा आणि हरित धोरणांचा स्वीकार करणाऱ्यांसाठी सवलती या उल्लेखनीय बाबी केल्या आहेत. मागील दोन दशकांतील  पुणे महापालिकेचे काम पाहून प्लॅटिनम नामांकन देण्यात आले आहे. विलास जावडेकर डेव्हलपर्स, गंगोत्री होम्स, अमर बिल्डर्स, कोहिनूर ग्रुप आणि मालपानी ग्रुप यांनाही आयजीबीसी ग्रीन प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांनी अनेक हरित प्रकल्प राबवल्याने त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयजीबीसीचे उपकार्यकारी संचालक एम.आनंद यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply