Pune News : पुण्यात नदीपात्रात सापडली पिंड, दर्ग्याजवळ मंदिराचे अवशेष सापडल्याचा अभ्यासकाचा दावा

पुणे : मागील अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पुणेश्वर आणि नारायणेश्वर या मंदिरांचा वाद सुरू असलेल्या चित्र पाहायला मिळत होतं. आता बडी दर्गा आणि छोटी दर्गा या दोन्ही ठिकाणी पुणेश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे असल्याचा दावा केला जात आहे.

यादरम्यान आता पुण्यातील नदीपात्राजवळ ज्या ठिकाणी बडी दर्गा आहे, त्याच ठिकाणी साफसफाई सुरू असताना नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याची माहिती इतिहास अभ्यासकांनी दिलेली आहे.

पुणे महानगरपालिकेकडून येथे सध्या नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू आहे. याचे काम सुरू असताना पुण्यातील संगमवाडी नदी पात्रात महादेवाची पिंड याबरोबर इंग्रजकालीन पिस्तूल देखील सापडली. ही ऐतिहासिक पिंड सापडल्याने ती पुरातत्त्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

इतिहास अभ्यासकांचा दावा..

नारायणेश्वर मंदिराचं प्रवेशद्वाराच्या पायऱ्या, मध्यभागी असलेलं प्रवेशद्वार, कोरीव कमान आणि समाधी स्थान सापडलं आहे. समाधी स्थान त्याच्या भोवती असलेला परीसर हा पुरातत्वीय अवशेषांकडे घेऊन जातो.

येथे पुरातन अवशेष सापडल्याने सफाई कामगारांनी काम थांबवलं. काल त्यांना काल रात्री साडे अकरा बारा वाजता कामकारांना मोठे नाग दिसले. आता येथे नारायणेश्वर मंदिराचे अवशेष सापडल्याने ही जागा सुरक्षित व्हावी असे सर्वांचे मत आहे, असे इतिहास अभ्यासक नंदकिशोर एकबोटे यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply