पुणे : भाविकांसाठी खुशखबर; या तीन गाड्यांना शेगाव, जलंब स्थानकांवर थांबा

अकोला : विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव येथे संत गजाजन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय व्हावी म्हणून अकोला स्थानकावरून जाणाऱ्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केल्या जाऊ शकतो.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस (२२१४१ /२२१४२) ता. ३१ मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव स्थानकावर थांबणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक १२४२२ अमृतसर-नांदेड एक्स्प्रेसला ता. २८ मार्चपासून, तर १२४२१ नांदेड-अमृतसर एकस्प्रेसला ता. २९ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबा असणार आहे. गाडी क्र. १२७५२ जम्मुतावी-नांदेड हमसफर एक्स्प्रेस ता. २७ मार्चपासून, तर गाडी क्र. १२७५१ नांदेड-जम्मुतावी हमसफर एक्स्प्रेस ता. ३१ मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेस जलंबला थांबणार
गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. ११०३९ व ११०४० महाराष्ट्र एक्स्प्रेस ता. २७ व २८ मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply