Pune Loksabha Election : 'पुणे लोकसभेसाठी भाजपकडून १० जण इच्छुक...' संजय काकडेंचा दावा; यादीत कुणा कुणाची नावे?

Pune Loksabha Election : राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभांच्या दृष्टीने मतदार संघांवर दावे- प्रतिदावे केले जात आहेत. अशातच आता भाजपकडून पुणे लोकसभा लढवण्यास तब्बल १० जण इच्छुक असल्याची माहिती माजी खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. तसेच मी सुद्धा लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचेही काकडे म्हणालेत. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. भाजपकडून १० जण पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले आहे. दहाही तसेच स्वतः संजय काकडेही लोकसभेच्या मैदानात उतरण्यास इच्छुक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

"पुणे  लोकसभेसाठी १० उमेदवार इच्छुक आहेत. दहाही उमेदवार आपापल्या परीने काम करत आहेत. ज्याला पक्षश्रेष्ठी दिल्लीतून उमेदवारी देतील त्याच्यासाठी संपूर्ण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार काम करतील. तसेच विजय हा भारतीय जनता पक्षाचाच होईल," असा दावा संजय काकडे  यांनी केला आहे.

कोण आहेत इच्छुक?

तसेच निवडणूक लढवण्यास मीसुद्धा इच्छुक आहे. मला तयारी करायची गरज नाही सर्व विधानसभा मतदारसंघात माझे कार्यकर्ते आहेत, असेही संजय काकडे म्हणालेत. दरम्यान, पुणे लोकसभा लढण्यासाठी भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वरदा बापट, सुनील देवधर, माधुरी मिसाळ यांची नावे सध्या चर्चेत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply