Pune Lok Sabha : प्रॉपर्टी टॅक्सच्या पावत्यांमध्ये नाव येतं, मग मतदार यादीत का नाही? आजीबाई संतापल्या

Pune Lok Sabha : राज्यातील ११ मतदारसंघासहित पुणे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान सुरु आहे. पुण्यातील शेकडो नागरिक मतदानासाठी सकाळपासून मतदानसाठी बाहेर पडले आहेत. मात्र, आजच्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. मतदारसंघात काही केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी मतदादारांची नावे नसल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारावरून एक पुणेरी आजी मतदार यादीत नाव नसल्यामुळे चिडल्या.
 
राज्यातील ११ मतदारसंघासहित पुणे लोकसभा मतदारसंघात देखील मतदान सुरु आहे. पुण्यातील शेकडो नागरिक मतदानासाठी सकाळपासून मतदानसाठी बाहेर पडले आहेत. मात्र, आजच्या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. मतदारसंघात काही केंद्रावर मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या. तर काही ठिकाणी मतदादारांची नावे नसल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. अशाच प्रकारावरून एक पुणेरी आजी मतदार यादीत नाव नसल्यामुळे चिडल्या.
 

पुणेकर आजीबाई म्हटल्या की, प्रॉपर्टी टॅक्स भरल्याचा पावत्या आहेत. तेव्हा माझं नाव हे व्यवस्थित यादीत येतं. मग आता का नाही? असा खोचक प्रश्न पुणेकर आजी यांनी विचारला. निलिमा जोशी असं या आजीचे नाव आहे.

निलिमा जोशी या आज सकाळी पुण्यातील कोथरूड भागात असलेल्या मतदान केंद्रावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांना घरातील सर्व सदस्यांची नावे दिसली. मात्र, त्यांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे त्या बिचाऱ्या हताश झाल्या.

...मग मतदार यादीत नाव का नाही? आजीबाईचा सवाल

'मी प्रत्येक वेळी मतदान करते. मात्र, असं कधीच झालं नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. प्रॉपर्टी टॅक्स भरल्याच्या देखील पावत्या आहेत. त्यावेळी माझं नाव बरोबर येतं. मग आता का नाही? असा सवाल करत या आजीबाईंनी संताप व्यक्त केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply