Pune Lok Sabha : काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी नाट्य संपेना; फ्लेक्सवर 'नेत्याचा' फोटो टाकला नाही म्हणून थेट मंडपवाल्याला मारहाण

Pune Lok Sabha : पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य संपत नसल्याचं दिसत आहे. आता पुणे शहर काँग्रेसमध्ये फ्लेक्सवर फोटो लावला नाही, यावरून थेट मंडपवाल्याला मारहाण झाल्याच्या प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीदरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे.

पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीसाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवर "नेत्याचा" फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली  आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Pune Accident News : नवले पुलाखाली बस आणि ट्रकचा विचित्र अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली

बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर काँग्रेसचे एक नेते  आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी फ्लेक्सवर फोटो नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरूहोण्यापूर्वीच संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारला. त्याला मारहाण केली.

काल केसरीवाडा येथे देखील काँग्रेसमधील नाराजी आणि अंतर्गत वाद समोर आले होते. आता पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे कॉंग्रेसमधील नाराजी काही संपत नसल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच कॉंग्रेसमध्ये नाराजीचे सुर उमटत असल्याचं दिसत आहे.

पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसत आहे. पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर "नेत्याचा" फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply