Pune Latest News : शिरुरमध्ये बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा पोलिसांना संशय

Pune Latest News  : पुण्यात बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिरुरमध्ये बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट कार्यरत होतं. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिरुर शहराजवळील रामलिंग रोडवर एका फ्लॅटमध्ये बनावट नोटांच्या छापखान्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी छापा मारला. या ठिकाणाहून नोटा बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

Pune Loksabha ByElection : पुणे लोकसभा पोटनिवडणूक तत्काळ घ्या! उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

बनावट नोटा वाटण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक केल्यानंतर बनावट नोटांचे रॅकेट उघड झाले आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी मनीष अमरपाल याला अटक केली आहे. त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३० हजार रुपये किमतीच्या बनावट जप्त करण्यात आल्या आहेत.

यावेळी आरोपी वास्तव्यास असणाऱ्या फ्लॅटमध्ये बनावट चलन तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, कागद, कलर, प्रिंटर पोलिसांनी जप्त केले आहे. बनावट नोटांच्या रॅकेटचे धागेदोरे दिल्लीपर्यत असल्याचा अंदाज रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply