Pune Koyta Gang : पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; मध्यरात्री १५ ते २० वाहनांची तोडफोड, नागरिक धास्तावले

Pune Koyta Gang : पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हातात कोयते आणि रॉड घेऊन दहशत माजवत एका टोळक्याने शहरातील धानोरी, कलवड परिसरात सोमवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास १५ ते २० वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन अल्पवयीन मुलांसह एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या गुंडाविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली होती.

Karjat Accident News : कर्जत-नेरळ मार्गावर भयानक अपघात, भरधाव कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू

पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली होती. ज्या भागात कोयता गँगचे गुंड दहशत माजवत होते. त्याच भागातून पोलीस या गुंडांची वाजत गाजत मिरवणूक काढत होते. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे कोयता गँगच्या गुंडांना चांगलीच धडकी भरली होती. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक केले जात होते.

पोलिसांच्या कारवाईनंतर काही दिवस कोयता गँगचे गुंड लपून बसले होते. कुठलाही दहशत माजवली, तर आपल्याला अटक होईल, असा धसका कोयता गँगच्या गुंडांनी घेतला होता. दरम्यान, पोलिसांचं दुर्लक्ष होताच कोयता गँग पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही गुंडांनी हातात कोयते तसेच रॉड घेऊन खेसे पार्क, डायमंड हॉल, तिरंगा नगर, बडी मस्जिद गल्ली अशा जवळपास अर्धा किलोमीटरच्या परिसरातील १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. यामध्ये रिक्षा आणि चार चाकी वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे. तोडफोडीची ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी तातडीने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply