Pune Koyata Gang : पुण्यात कोयता गँगचा हैदोस थांबता थांबेना; हाणामारीत दोन जण जखमी

पुण्यात कोयता गॅंगचा धुमाकूळ अद्यापही थांबलेला नाही. आतापर्यंत या टोळीतील ५ सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच अन्य गुन्हेगारांचा शोध घेणे सुरू आहे. अशात काल रात्री बालेवाडी, बाणेर येथील गणराज चौकात रात्री १० च्या सुमारास कोयता गॅंगने पुन्हा हैदोस घातला. 

चार पाच जण दुचाकीवरून हातात कोयते घेऊन आले. या टोळक्यात भीषण हाणामारी झाली. यावेळी हाणामारीसाठी सिमेंटच्या मोठया विटा, बांबू, कोयते, दांडूच्या सहाय्याने त्यांनी दोन व्यक्तींवर हल्ला केला. या घटनेत दोघेही जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे , तसेच त्यांचे सहकारी घटनास्थळी हजर झाले असून पुढील तपास सुरू आहे. जखमींना नेमके कोणत्या रुग्णालयात हलविण्यात आले याची माहिती समजू शकलेली नाही.

दरम्यान, घटनास्थळी तीन दुचाकी मिळाल्याअसून, त्यातील एका दुचाकीचे बरेच नुकसान झाले आहे. दुचाकीचे झालेले नुकसान पाहता इथे किती भयानक स्वरूपात राडा झाला असावा हे लक्षात येत आहे. ही मुलं कोण होती, कुठली होती याबद्दल माहिती मिळालीनसून पुढील तपास चतुष्रूंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत आहेत.

पुण्यातले दहशतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. काल पुण्यात कोयता गँगबरोबरच पालघन गँग सक्रिय असल्याचे समजले आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडी येथे गाडी हळू चालवा असे सांगितल्याने काही तरुणांनी हातात पालघन घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोठा वाद पाहायला मिळाला. सदर घटनेत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *