Pune Koyata Gang : 'कोयता गँग'ची दयनीय अवस्था! पोलिसांनी हलगी वाजवत काढली धिंड

पुणे : हातात कोयते घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांच्या टोळीची पुणे पोलिसांनी हलगी वाजवत धिंड काढली. यामुळं दहशत पसरवण्याच्या नादात या तरुणांना लाजिरवाण्या गोष्टीला तोंड द्यावं लागलं. गेल्या काही दिवसांत पुण्यात कोयते घेऊन दहशत पसरवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा खून करण्यासाठी कोयते जमा करणाऱ्या एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यातील कोंढवा भागात हा सगळा प्रकार घडला होता. या टोळीत पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन जण अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी या टोळीतील दोघांना अटक केली असून ज्या ठिकाणी या आरोपींनी दहशत माजवली होती त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. अनवाणी पायाने हलगी वाजवत पोलिसांनी त्यांना संपूर्ण परिसरातून फिरवले. दहशत वाजवणाऱ्या या गुंडांची अशी अवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply