Pune : खडकवासला धरणाच्या पाण्यात फेकण्यात आला औषधांचा साठा; हवेली पोलीस आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

Pune Khadakwasla Dam News : लाखो पुणेकरांची तहान भागविणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे अधिकारी व पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनाम्यासह इतर कार्यवाही सुरू आहे.

दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा थेट पाण्यात फेकण्यात आल्याने खडकवासला धरणासह पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Lalit Patil Arrested : मोठी बातमी! ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला चेन्नईमधून अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

खडकवासला धरणावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चौपाटीजवळ धरणाच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात औषधांचे बॉक्स फेकलेले असल्याचे दिसून आले.

काही बॉक्स पाण्याजवळ तर काही औषधांच्या बाटल्या थेट पाण्यात फेकण्यात आलेल्या होत्या. यामध्ये इंजेक्शन, लहानमोठ्या भरलेल्या औषधांच्या बाटल्या व इतर साहित्य दिसून येत आहे. सुरक्षा रक्षकांनी तातडीने ही माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत हवेली पोलीसांना कळविल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात पडलेल्या औषधांच्या बाटल्या बाहेर काढून घेतल्या असून घटनास्थळी काचांचा खच दिसून येत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे व हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

खडकवासला धरणाच्या सुरक्षिततेबाबत सकाळ' ने सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधलेले असून सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे पर्यटकांना पाण्यात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच दिवसभर धरण परिसरात तेरा सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.

मात्र रात्रीच्या वेळी चौपाटी परिसरात सुरक्षारक्षक नसल्याने थेट धरणाच्या पाण्यात औषधे फेकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीही सुरक्षारक्षक तैनात असण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply