Pune Hoarding : होर्डिंगसाठी उभा केलेला सांगाडाहटविला

Pune Hoarding : विविध प्रकारच्या त्रुटी असल्याचे कारण देत महापालिकेने अखेर शुक्रवारी (ता. १७) दारात होर्डिंग उभे करण्यासाठी दिलेली परवानगी रद्द केली. त्यानुसार त्याचा सांगाडाही काढण्यास सुरुवात केली. शहरात झाडे तोडून उभ्या केल्या जाणाऱ्या होर्डिंगची परवानगी रद्द करण्याचा आदेश दोनच दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी काढला. असे असताना महापालिकेच्या दारातच ‘पीएमपी’ला होर्डिंग उभे करण्यास महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने परवानगी दिल्याचा प्रकार उघडकीस आला. होर्डिंगसाठी झाडाच्या अनेक फांद्याही तोडल्याचे निदर्शनास आले.

वास्तविक राज्य सरकारने २०२२मध्ये आकाशचिन्ह विभागासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यामध्ये पदपथावर आणि सार्वजनिक रस्त्यावर कोणताही जाहिरात फलक लावता येणार नाही. जेथे पदपथ नसेल, तेथेही सार्वजनिक रस्त्यावर जाहिरात फलक लावता येणार नाही, अशी तरतूद आहे. त्यामुळे या नियमाचे उल्लंघन करून पीएमपीला होर्डिंग उभे करण्याची परवानगी कशी देण्यात आली, असा प्रश्‍न उपस्थित होतो. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाले. होताच महापालिकेने परवानगी नाकारत होर्डिंगचा सांगडा काढण्यास सुरुवात केली.

Colonel Vaibhav Kale : कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

यासंदर्भात उपायुक्त माधव जगताप म्हणाले, ‘‘पीएमपीला होर्डिंग उभे करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यासाठीचे शुल्कही भरले होते. परंतु होर्डिंग कुठे उभे करणार? त्याचे लोकेशन नमूद केले नव्हते. ज्या आकाराच्या होर्डिंगला परवानगी दिली, तो आकार आणि उभे राहत असलेल्या होर्डिंगच्या आकारत तफावत असल्याचे दिसून आले. त्यामुळे परवानगी रद्द केली असून होर्डिंगचा सांगाडाही काढण्यात येत आहे.’’

‘पीएमपी’ने माहिती दडवली?

‘पीएमपी’ महापालिकेची उपसंस्था आहे. ‘पीएमपी’ने होर्डिंगसाठी परवानगी घेताना माहिती दडविल्याचे उपायुक्तांच्या बोलण्यावरून स्पष्ट होते. आकाशचिन्ह विभागाने परवानगी देताना होर्डिंगच्या लोकशनचा उल्लेख नसताना कशी परवानगी दिली, या प्रश्‍नांची उत्तरे गुलदस्तात आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply