Pune Heat Wave : पुण्यात उन्हाचे चटके असह्य; उष्माघाताने तहानल्या, पाण्यातून विषबाधा झाल्यानं शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू

Pune Heat Wave : पुण्यात सध्या उन्हाचे चटके असह्य होत आहेत. उष्माघाताने तहानल्यामुळे शेळ्या आणि मेंढ्या शेतातील साचलेले पाणी प्यायल्या. त्यामुळे विषबाधा होऊन त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना शिरूरमध्ये घडली आहे. एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यांनी शेतातील साचलेले पाणी पिल्यामुळे विषबाधा झाली.

मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या आणि ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ऐन दुष्काळात जनावरांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे .

Mumbai News : मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

उन्हाळा कडक असल्यामुळे जनावरांना आवश्यकतेनुसार पाणी पाजावे. प्रथम पाणी दूषित आहे का? याची खात्री करूनच जनावरांना पाणी पाजलं पाहिजे. तसंच उन्हाच्या वेळी कांद्याची पात शेळ्या मेंढ्यांना चारू नये, योग्य प्रमाणात दिली जावी. दुपारच्या कडक उन्हात शेळ्या मेंढ्या चारण्याऐवजी सावलीला बसवाव्यात, असं आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलं (Heat Stroke In Pune) आहे.

आठवडाभरापासून पुणे शहर आणि जिल्ह्याचं सरासरी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त आहे. पुढील आठवड्यातही हेच तापमान कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील. तसंच दिवसभर उन्हाचा चटका तापदायक ठरेल, वेधशाळेने अशी वेधशाळेने वर्तवली आहे. सध्या मराठवाड्यावर समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. नांदेड जिल्ह्यात देखील मागील आठवडाभरापासून उष्णतेची लाट कायम आहे. आज कमाल तापमान ४३ पूर्णांक २ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply