Pune : हडपसर येथे सराफी पेढीतून १२४ तोळ्यांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे - हडपसर येथील एका सराफी पेढीतून सुमारे ८० लाख रुपये किमतीचे १२४ तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात पेढीमध्ये काम करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सराफी पेढीतील कर्मचारी महिलेसह सागर सूर्यकांत नखाते (वय ३२, ससाणेनगर, हडपसर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ओंकार प्रताप तिवारी (वय २९, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील मगरपट्टा भागात संबंधित सराफी पेढी आहे.

संशयित आरोपी महिला व नखाते याच दुकानात लेखा विभागात कामाला आहेत. दालनातील सोन्याच्या वस्तू, गंठण, पाटल्या तसेच अन्य दागिने दोघांनी परस्पर वित्तीय कंपनीकडे गहाण ठेवले होते. त्यापोटी मिळालेली रक्कम त्यांनी शेअर बाजारात गुंतविली होती. सराफी पेढीतील व्यवस्थापनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply