Pune GBS : पुण्यात जीबीएस फोफावतोय, ४७ जण ICU मध्ये, रूग्णसंख्या १६३ वर


 

Pune GB Syndrome News : पुण्यात जीबीएस आजाराचा विळखा वाढतच चाललाय, दिवसागणिक रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सोमवारी पुण्यात पाच संशयीत रूग्णाची भर पडली, त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १६३ वर पोहचली आहे. यामधील ४७ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर इतरांवर उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असलेल्या रूग्णांमधील ४७ जण आयसीयूमध्ये आहेत.

पुण्यात जी बी एस रुग्णाची संख्या १६३ वर पोहचली आहे. सोमवारी पुण्यात पाच नव्या रूग्णांची भर पडली आहे. पुण्यात आतापर्यत पाच जीबीएस रूग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. आयसीयूमध्ये असणाऱ्या ४७ रूग्णांपैकी २१ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून जीबीआस आजाराने पुण्यात थैमान घातलेय, त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन कऱण्यात आलेय.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply