Pune Fraud News : पुण्यातील प्रसिद्ध सांबार हॉटेलची फ्रेंचायजी देण्याचे आमिष; तब्बल ३० लाखांचा घातला गंडा.. पुण्यात खळबळ

Pune Crime : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील प्रसिद्ध सांबार हॉटेलची फ्रेंचाजची देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल ३० लाखांचा गंडा घालण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भारती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात सांबार हे प्रसिद्ध हॉटेल असून अनेक ठिकाणी त्याच्या फ्रेंचाइजी आहेत. फिर्यादी संजय शामराव येवले हे सातारा रोडवर असणाऱ्या सांबार हॉटेल येथे फ्रेंचाइजीच्या चौकशीसाठी गेले होते. त्यावेळी रामाजयम कुट्टी यांनी बाजीराव रोड येथे त्याच हॉटेलचे नवीन काम सुरू असल्याचे सांगितले.

तसेच या हॉटेलची फ्रँचाइजी देण्यासाठीचे १५ लाख रुपये, हॉटेलसाठी लागणारे साहित्यासाठी १० लाख रुपये आणि कामगारांच्या पगारासाठी ५ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले.

त्याप्रमाणे येवले यांनी एकूण ३० लाख रुपये दिले. त्यानंतरही २ ते ३ महिने उलटून गेले तरी 

Pune : विकेंडमुळे लोणावळ्यातील भुशी धरण गर्दीने फुलले! लायन्स, टायगर पॉईंट धुक्यात हरवले

त्यांना हॉटेलची फ्रेंचाइजी मिळाली नाही. तसेच पैसे मागितल्यानंतर येवले यांनी बँकेत चेक टाकला असता बँक अकाऊंट बंद असल्याचे समजले.

या सगळ्या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रामाजयम गोविंद राज कट्टी, स्वप्निल रामाजयम आय्या कुट्टी, अनुप्रियता रामाजयम आय्या कुट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply