Pune : कोथरूडमधील दांपत्याची १३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तिघांना अटक

Pune :  कोथरूडमधील एका दांपत्याची १३ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडके या तिघांना नाशिकमधून अटक करण्यात आली आहे. ही माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

मुलींचा आजार बरा करण्याच्या बहाण्याने एका दांपत्याची १३ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ६) रात्री पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अभियंता दीपक डोळस यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. वेदिका कुणाल पंढरपूरकर, कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (रा. महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (रा. नाशिक) आणि इतर दोघेजण अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

Pune : १८०० कोटींच्या जमीन घोटाळ्याच्या आरोपांनंतर मोठा निर्णय; वादग्रस्त व्यवहार रद्द—अजित पवारांनी दिली माहिती

तक्रारदार दीपक डोळस (वय ५७) हे मूळचे पुण्यातील असून, इंग्लंडमध्ये आयटी अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या दोन मुलींवर उपचारासाठी ते २०१० मध्ये भारतात परतले. डोळस यांची भजनी मंडळाच्या माध्यमातून २०१८ मध्ये दीपक खडके याच्याशी ओळख झाली. खडके याने डोळस दांपत्याची वेदिका पंढरपूरकर या महिलेशी ओळख करून दिली. या महिलेने डोळस दांपत्याचा विश्वास संपादन करून त्यांची पूर्ण माहिती घेतली. 'तुमच्या मुलींचा आजार तुमच्या संपत्तीमुळे आहे.

ही संपत्ती विकली तरच त्या बऱ्या होतील,' असे सांगितले. या महिलेच्या सांगण्यावरून डोळस दांपत्याने इंग्लंडमधील ड्युप्लेक्स घर, फार्महाऊस, कोकण आणि सासवडमधील शेतजमीन विकून सुमारे १४ कोटी रुपये त्या महिलेच्या खात्यांत वर्ग केले. इतकी मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलींच्या आरोग्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट त्या महिलेने त्यांना आणखी एक घर विकण्यास भाग पाडून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *