Pune Firing : पुण्यात चाललंय काय? शहरात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार, परिसरात खळबळ

Pune Firing :  पुण्यात काल मंगळवारी सायंकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. त्यानंतर आज बुधवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसरमध्ये ही गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सलग दोन दिवसाच्या गोळीबाराच्या घटनेनेमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

पुण्यात काल संध्याकाळी बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न झाला. काल सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या वन प्लस शोरुम समोरील धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर दुसऱ्यादिवशी गोळीबाराची घटना घडली. पुण्यातील हडपसरमध्ये बुधवारी गोळीबाराची घटना घडली.

Sanjay Raut : बंडखोरी करणाऱ्यांची पक्षाने हकालपट्टी करावी, संजय राऊतांची विशाल पाटील यांच्यावर टीका

पुण्यातील हडपसरमधील शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटीसमोर ही गोळीबाराची घटना घडली. व्यावसायिक वादातून एका माजी सैनिकाने गोळीबार केला. माजी सैनिक जयवंत खलाटे यांच्यावर आरोपी माजी सैनिक सुधीर शेडगे या आरोपीने गोळीबार केला. खलाटे आणि शेडगे दोघेही माजी सैनिक आहेत. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply