Pune Fire News : पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, कार्यक्रमात प्रेक्षकांची उडाली तारांबळ

Pune Fire News : पुण्यात सुरू असलेल्या सवाई गंधर्व महोत्सवात आगीची घटना घडली आहे. महोत्सव मंडपाच्या मागील बाजूस असलेल्या पडद्यावर तार तुटून पडल्याने तेथील कापडाने पेट घेतला. दरम्यान सुरक्षेच्या सर्व उपाययोजना जागीच उपलब्ध असल्याने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले असून मोठी दुर्घटना टळली आहे. अग्नीशमन दलाचा बंब व कर्मचारी महोत्सवस्थळी कायम उपस्थित असतात. त्यांच्या मदतीने सुरक्षाकर्मी आणि स्वयंसेवक यांनी परिस्थिती लगेचच नियंत्रणात आणली.

Coronavirus New Variant : कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे केरळमध्ये 2 जणांचा मृत्यू, कर्नाटक-तामिळनाडू अलर्ट मोडवर

कार्यक्रमाच्या मंडपाच्या मागील बाजूस फोटोगॅलरी असलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. कार्यक्रम सुरु असताना आग लागल्यानं कार्यक्रमात प्रेक्षकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आजचा या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे. काही वेळ प्रेक्षक घाबरलेल्या अवस्थेत होते. मागे बसलेल्या प्रेक्षकांनी मंडपाच्या बाहेर धाव घेतली. दरम्यान पं. सुहास व्यास यांच्या गायन संपलं होतं. त्यानंतर काही वेळ ब्रेक होता. यादरम्यान ही आग लागल्याची माहिती आहे. मात्र फार मोठी आग नसल्याने आगीवर लवकर नियंत्रण मिळवलं आणि कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे.  



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply