Pune Fire News : गणपतीच्या आरतीत विघ्न, मंडपाला लागली आग; पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Fire News : पुण्यातून एक मोठं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आग लागल्याची घटना घडली आहे. या मंडळाच्या मंडपात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गणपतीची आरती करत होते. मात्र, आग लागल्यानंतर जे. पी. नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावे लागले. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मंडप परिसरात पाऊस पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपात आग लागली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे गणपतीची आरती करत असताना या मंडपाला ही आग लागली.

Rain Update: पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; घाटांतील प्रवाशांना 'सतर्क'तेचा इशारा

साने गुरुजी तरुण मंडळाकडून महाकाल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. या मंदिराच्या कळसाला आग लागली. मंडपाला आग लागल्यानंतर जे पी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलं.

साने गुरुजी तरुण मंडळाच्या मंडपाला आग लागली, त्यावेळी परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे काही मिनिटांत ही आग विझली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. मंडपाला नेमकी आग कशी लागली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply