Pune Fire : टिंबर मार्केट परिसरातील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग; अग्निशमन दलाचे 30 बंब घटनास्थळी

Pune : पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमध्ये एका लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून शेजारील चार घरांना ही या आगीची झळ बसली आहे. ही आग पहाटे ४.१४ वाजताच्या सुमारास लागली आहे. ही आग एवढी भीषण आहे की, आगीचे आणि धुराचे लोट दूरवरुन दिसत आहे. 

या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाचे तब्बल ३० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडूनआग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. असे असले तरी ही आग एवढी भीषण आहे की यात लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

30 अग्निशमन वाहने घटनास्थळी

या घटनेची माहिती मिळताच पुणे-पुणे कॅन्टोमेंट-पीएमआरडीए आणि पालिकेच्या अग्निशमन दलाची एकुण 30 अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

आग एवढी भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पथकाला अनेक अडचणी येत असल्याची माहिती पुणे अग्निशामक दलाचे प्रसिद्धी प्रमुख नीलेश महाजन यांनी माहिती दिली.घटनास्थळी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासमवेत इतर २० अधिकारी व जवळपास १०० जवान उपस्थित आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply