Pune-Ernakulam Express : सांगली, मिरजकरांचा प्रवास खडतर, पुणे - एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस २ महिन्यांसाठी रद्द

Pune-Ernakulam Express : रेल्वे स्थानकादम्यान सुरू असलेल्या कामांमुळे पुणे - एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून ही रेल्वे सेवा २ महिन्यासांठी रद्द करण्यात आली असून, ही रेल्वे सेवा पुणे- सांगली मार्गे बंद असणार आहे. १८ जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे - सांगली मार्गे बंद असणार असल्याची माहीती आहे. तर ही एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे.

दक्षिण - पश्चिम रेल्वे अंतर्गत असणाऱ्या कॅसलराक ते कुलम रेल्वे स्थानकादरम्यान काम सुरू आहे. रेल्वे स्थानकादरम्यान सुरू असलेल्या कामांमुळे, प्रवाशांच्या सुरक्षा कारणास्तव रेल्वे प्रशासनाकडून सातारा,सांगली आणि मिरजमार्गे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस दोन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे.

१८ जानेवारी ते १२ एप्रिलपर्यंत ही रेल्वे सेवा पुणे - सांगली मार्गे बंद असणार असून, ही एक्सप्रेस पनवेल, मडगाव मार्गे दोन महिन्यांसाठी सुरू राहणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर रेल्वे सेवा १८ जानेवारी ते १२ एप्रिल आणि बेळगावकडून पुण्याकडे जाणारी एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस २० जानेवारीपासून १४ एप्रिल पर्यंत बंद असणार आहे.

Nylon Manja : नायलॉन मांजाची विक्री; नाशिकमध्ये ५ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कल्याणमध्येही ६ जणांवर गुन्हा

यासंदर्भातील माहिती मिरज रेल्वे कृती समितीकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा, सांगली आणि मिरज कोल्हापूरमधून केरळला जाणाऱ्या प्रवाशांती मोठी गैरसोय होणार आहे. जर आपण एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसचा वापर करून प्रवास करणार असाल तर, दोन महिन्यांसाठी इतर मार्ग किंवा इतर वाहनाचा वापर करून प्रवास करा, कारण दोन महिन्यांसाठी रेल्वे सेवा पुणे- सांगली मार्गे बंद असणार आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply