Pune Election Result : पुणे महापालिका निकालांची उत्सुकता: साडेअकराला पहिला गुलाल, कोणते प्रभाग ठरणार निर्णायक?

 

Pune : महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणीच्या सर्वाधिक २० फेऱ्या या धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयामध्ये होणार आहेत. पाचसदस्यीय एकमेव प्रभाग या क्षेत्रीय कार्यालयात असल्याने येथील फेऱ्यांची संख्या वाढली आहे. बिबवेवाडी, कसबा विश्रामबाग आणि कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी १२ फेऱ्या होणार असल्याने येथील निकाल लवकर जाहीर होतील. एका फेरीला अर्धा तास लागणार असल्याने पहिला निकाल साडेअकराच्या दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे.महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ४१ प्रभागांतून १६५ सदस्य निवडून येणार आहेत. यातील ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे.

१५ अधिकारी नियुक्त
या निवडणुकीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता सर्वांत कमी चार फेऱ्या १३ प्रभागांमध्ये होणार असून, येथील निकाल लवकर जाहीर होईल. पाचसदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रजमध्ये १० फेऱ्या होणार आहेत. येथे निकालाला विलंब होऊ शकतो.

Kolhapur : कोल्हापुरातील DYSP च्या गाडीला कर्नाटकात भीषण अपघात; आईसह दोघांचा मृत्यू, परिसरात हळहळ

दोनच प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुप्पर-इंदिरानगर व प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडीमध्ये प्रभागनिहाय सर्वाधिक प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग क्रमांक २०,२१,२६) व कसबा विश्रामबागवाडा (प्रभाग २५,२७,२८) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत; तसेच कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्वात कमी १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील मतमोजणी लवकर पूर्ण होणार आहे.

मतमोजणीसाठी एका 66 फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो. साडेतीन-चारपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, असं महापालिका निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “Pune Election Result : पुणे महापालिका निकालांची उत्सुकता: साडेअकराला पहिला गुलाल, कोणते प्रभाग ठरणार निर्णायक?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *