Pune Dumper Accident Update : फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडण्याऱ्या डंपर चालकाला अटक, पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Wagholi Dumper Accident Latest Update : पुण्यात भरधाव डंपरने फूट पाथवर झोपलेल्या नऊ जणांनाचिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे, तर सहा जण जखमी आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी डंपर चालकांला अटक केली आहे.

रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुण्यातल्या वाघोलीतील केसनंद फाट्यावर हा अपघात घडला. यावेळी डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. या डंपरचालकाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. गजानन तोटे असं डंपर चालकाचे नाव आहे.

Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची कंटेनरला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन तोटे भरधाव वेगात डंपर चालवत होता. याठिकाणी तीव्र उतार असल्याने त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि डंपर थेट फुटपाथवर गेल्याने हा अपघात घडला.
यावेळी फुटपाथवर १२ जण झोपले होते. हे सर्वजण रविवारी अमरावतीहून पुण्यात कामासाठी आले होते. यावेळी भरघाव डंपर सरळ त्यांच्या अंगावर गेला. यात वैभवी रितेश पवार (१), वैभव रितेश पवार (२) रीनेश नितेश पवार (३०) या तिघांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply