पुणे विभागात आणखी २४ रेल्वे स्थानके ; दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट

पुणे : रेल्वेच्या पुणे विभागाचे क्षेत्रफळ वाढणार आहे. रेल्वे बोर्डाने दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोलापूर विभागात असलेला सुमारे २२४ किलोमीटरचा मार्ग आणि त्यावरील २४ स्थानके पुणे विभागात समाविष्ट होतील. त्यामुळे सोलापूर विभागाचे क्षेत्र घटणार आहे. यामुळे गाड्यांचे परिचालन अधिक परिणामकारक होईल. याआधी पुणे विभागाचे कार्यक्षेत्र सोलापूरपेक्षा कमी होते. या विभागांच्या कार्यक्षेत्रात संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हा प्रस्ताव २०२१ मध्ये रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. त्यास बुधवारी मंजुरी मिळाली..

Ravikant Tupkar : जामीन मिळताच रविकांत तुपकर म्हणाले, 'त्यांना धडा शिकविणार...'

प्रवाशांसाठी फायदे

  • अहमदनगर, शिर्डीसारखी स्थानके विभागात आल्याने येत्या काही दिवसांत या दोन शहरांसाठी पुण्याहून डेमूसारखी सेवा सुरू होऊ शकते

  • नव्या गाड्यांमुळे पुण्याशी दोन शहरांची कनेक्टिव्हिटी वाढणार

  • शिर्डी व अहमदनगर या शहरांतील नागरिकांना रेल्वेविषयक कामांसाठी सोलापूरच्या तुलनेत पुण्याला येणे सोपे

  • अपघात झाल्यास अथवा आणीबाणीच्या स्थितीत सोलापूरच्या तुलनेत पुण्याहून मदत लवकर मिळणार

मालवाहतुकीला सोयीचे

दौंड कॉर्ड लाइन ते मनमाड सेक्शन हा भाग सोलापूर विभागात येतो. त्यामुळे सोलापूर विभागाचे चालक ह्या मार्गात रेल्वे चालवितात. यात प्रवासीगाड्यांना काही अडचण नाही, मात्र मालगाड्या पुण्याहून मनमाडकडे निघाल्यावर काष्टी आणि पाटस अशा छोट्या स्थानकांवर चालकांसाठी दोन ते तीन तास थांबविल्या जातात. हा भाग पुणे विभागात समाविष्ट झाल्यानंतर असा विलंब टळेल.

क्षेत्रफळाचे प्रमाण

विभाग-सध्याचे-वाढीव

पुणे-५३१-७५५

सोलापूर-९८१-७५७

(आकडे किलोमीटरमध्ये)

गेल्या काही वर्षांपासून हा प्रस्ताव विचाराधीन होता. त्याला अखेर रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली. एक एप्रिल पासून हा मार्ग पुणे विभागात जोडला जाईल. यामुळे पुणे विभागाचे उत्पन्न वाढणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply